नामदेवराय - आपला प्रतिसाद वाचला. मुद्देही महत्त्वाचे वाटले, भावार्थ पटलाही. तरीही नेमका रोख आणि येथील संदर्भ कळला नाही.

माझीही आणखी थोडी भर -

चर्चेतील ज्य ब्रिटीश अथवा फ़्रेंच माणसाने नावे ठेवली आहेत ती जास्त करून भारतातील दारीद्र्याशी संबंधीत आहेत.
असे सामान्यीकरण करता येईल असे वाटत नाही. दोन कारणे -

  1. हे लाजिरवाणे -- नजरा आणि लाचारासारखे पैसे मागणे -- वागणे आणि गरिबीचा संबंध आहे असे म्हणता येणार नाही.
    मी स्वतः गरीब घरातून पुढे येत आहे. माझ्या अगदी जवळच्या माहितीतील अनेक गरीब कुटुंबे आहेत. मरण परवडले पण असा हीनपणा जमणे यातील अनेकांना शक्य नाही याची खात्री या युगातही मी देऊ शकेन.
  2. हा मानसिकतेचा प्रश्न आहे. हलकट प्रवृत्ती ही समाजाच्या सर्व थरात दिसते. अगदी श्रीमंत वर्गातही.
    शरम वाटावी अशा महाभागांची उदाहरणे अगदी परदेशातही काही कमी नाहीत. श्रीमंतीत लोळताना आणि आजूबाजूला यथायोग्य नागरी व्यवस्था असतानाही तेथे व्याभिचार करणारी मंडळी येथेही आहेत.