नामदेवराय - आपला प्रतिसाद वाचला. मुद्देही महत्त्वाचे वाटले, भावार्थ पटलाही. तरीही नेमका रोख आणि येथील संदर्भ कळला नाही.
हा प्रकार फक्त गरीब अथवा समाजातील आर्थिकस्तरातील खालच्या पातळीवरून होतो असा त्याचा (सुरवातीच्या चर्चेचा) थोडाफार अर्थ होतो. माझे एव्हढेच म्हणणे आहे (रोख आहे की) की लाचारी, भिका मागणे वगैरे फक्त काही भिकारीच करत नाहीत की रस्त्यावरील सामान्यमाणूसच काही फक्त बायकांशी वाईत वागणारा असू शकतो, असे नाही.
मला एका अमेरिकन कंपनीचा चीफ फ़ायनॅन्शीयल ऑफ़िसर वैतागून म्हणाला की त्याला भारतातील (बंगलोरमधे) लोकांशी "बिझिनेस" करायला आवडत नाही कारण उठसूठ पैसे मागत असतात...मी त्याच्याशी अर्थातच (वरकरणी) असहमत होत वाद घातला. पण त्याचा बोलण्याचा रोख हा पैशाची हाव असणाऱ्या वृत्तीवर होताअअणि त्याने दिलेली उदाहरणेही पटण्यासारखी होती.
पण अशा धंदेवाल्यांमुळे, लैंगीक छळ (सेस्शुअल हरॅसमेंट) करणाऱ्या माहीती क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे (मला वाटते इन्फ़ोसिसच्या कॅलीफ़ोर्नीयाच्या ऑफ़िसमधील) आपण लाजत नाही - माझा वाद फक्त या अशा असमतोल वृत्तीशी आहे.
उठसूठ फक्त राजकारण्यांना नावे ठेवणे आणि स्वतः मात्र २०% च आहे म्हणून अभ्यासाप्रमाणेच वागण्यातही नागरीकशास्त्र न वापरणे या मुळे आपली अवस्था होत आहे.