वा माधवराव, अगदी समर्पक लेख!

चांगले संवादकौशल्य असणारे लोक लवकरच वरच्या हुद्द्यावर जातात असा अनुभव आहे. कारण लोकांना नियंत्रित करणे, त्यांच्याकडून हवी ती कामे करवून घेणे ही त्या पदाची आवश्यकता असते. ते योग्य संवादानेच जमते.

उदा. राजकिय नेता, समूह प्रतिनिधी, प्रकल्प प्रमुख, कार्यालय व्यवस्थापक इत्यादी.

संवादकलेलादेखील विविध माध्यमांचे पदर असतात प्रत्येक माध्यमाचे वेगळे सिद्धांत असतात. त्यापैकी भाषणे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी आदींचे व्यावसायिकरित्या प्रशिक्षण मिळते. (प्रत्यक्ष) समूह चर्चेचे प्रशिक्षण व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात असते. परंतु, दैनंदिन जीवनातील परस्परांमधील संवादाचे तसेच आंतरजालावरील व्यासपीठे, निरोपे यांवरील संवादाचे प्रशिक्षण फारसे मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी बहुतेक जण अडखळत शिकताना दिसतात.