लाज नाही पण वाईट वाटले.  बंगलोरसारख्या शहरात एखाद्या स्त्रीला असे अनुभव आले हे पाहून वाईट वाटले.  त्या स्त्रीचे नागरिकत्व हा दुय्यम मुद्दा आहे.  गरिबी/बेकारी/मुलांवरचे अन्याय एखादा ब्रिटीश माणूस म्हणाला म्हणून नाही तर आपल्याच लक्षात येऊन आपण हा अन्याय दूर करण्याइतके सुजाण झालो नाही असे वाटते. 

मग या दोघांनीच त्याची भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.

माफी मागायची गरज मला वाटत नाही.   पण एखाद्याला तसे वाटले आणि केले तरी ठीक आहे पण यावर मार्टिन आणि लुई यांनी तू कशाला माफी मागितली पाहिजेस असे काहीसे म्हणावे अशी माझी अपेक्षा राहील. 

पण तुम्ही लोक कसे काय राहता तिथे हा त्यांचा प्रश्न होताच.

हे जरा आधीच मेलेल्याला मारल्यासारखे वाटते.  हा प्रश्न नक्की कशासाठी विचारला आहे असे वाटते?  -   भारतीयांच्या भवितव्याबद्दल हताश होऊन का केवळ एक उद्गार म्हणून का तुमच्या मित्राला थोडी पडती बाजू घ्यायला लावायला? 

अमेरिकन आणि ब्रिटिश अनेक लोक भारतात असंख्य सामाजिक हिताची कामे करत आहेत (प्रत्येकाचे अंतस्थ हेतू आणि त्याला हवा तो फायदा वेगळे असतात हे खरे)  त्यातला मार्टिन वाटत नाही - निदान तुम्ही जे काही लिहीले आहेत त्यावरून.  अश्या व्यक्तीची माफी मागून झाल्या प्रकाराची जबाबदारीही स्विकारण्याची गरज नाही पण तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्या लोकांना परदेशी व्यक्तींना कसे वागवावे याचे प्रशिक्षण देणे किंवा हातभार लावणे आणि दुसऱ्याच्या हक्कांबद्दल, गरजांबद्दल जागृत करणे ह्या गोष्टी करता येतील. 

 

सुहासिनी