तुम्हाला काय वाटते?

काहीही विशेष वाटले नाही.

भारतीय संस्कृती जागतिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे का?

नाही.

पर्यटकांनी भारतात येताना काळजी घ्यावी का?

नक्कीच. तशी ती कुठल्याही देशात जाताना घ्यायलाच हवी.
कपड्यांचे म्हणाल तर शक्यतो जिथे जाल तेथील कपडे वापरणे हा पर्यटनाचाच भाग समजावा.

की भारतीयांना पर्यटकांशी कसे वागावे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे?

सरकारचे याबद्दल प्रयत्न चालू आहेत. पण माझ्यामते ते फारच तोकडे आहेत. अशा प्रशिक्षणापेक्षा लोकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष पुरवणे जास्त योग्य ठरेल.

लेखिकेला प्रतिप्रश्न,
१. भारतीय लोक परदेशात जातात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी देखिल अश्लील संभाषण ऐकू येते/अश्लील दृश्य दिसते. त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
२. भारतीय लोकांनादेखिल परदेशात चोरी/लुबाडणुक यांचे अनुभव येतात. त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
३. भारतीय लोकांना अजूनदेखील परदेशात कमीपणाने वागवले जाते (Black/Asian). त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
४. परदेशी लोक भारतात येऊन अश्लील धंदे करतात त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
(वरील सर्व प्रश्नांसाठी दाखले देण्याची लेखकाची तयारी आहे.)

येथे प्रश्न विचारून नामोहरम करण्याच उद्देश नसून संस्कृतींमधे असलेला फरक अथवा समानता अधोरेखित करणे हा आहे.


ज्या भारतीयांना आपण भारतीय असल्याची वा भारताची लाज वाटते त्यांची मला कीव येते.

अवांतर: लहानपणी एक पुस्तक वाचले होते. एका भारतीय नौदल अधिकारी रागाच्या भरात भारताविषयी काही अपमानास्पद बोलतो. त्याचे कोर्टमार्शल होते. तो माफी मागत नाही. नौदल त्याला कायम देशाबाहेर राहण्याची शिक्षा देते. सुरवातीला त्याला काहीच वाटत नाही. पण नंतर त्याला त्याची चूक कळून येते. अशी काहीशी कथा होती. तपशिल आता आठवत नाही आणि उत्तरार्ध इथे विस्ताराने सांगणे शक्य नाही. पण त्या पुस्तकाचा संस्कार मात्र तेव्हापासून खोल खोल रुजला आहे.
आनंदकंद कैसा, हा हिंद देश माझा....