आपले उत्तर आणि प्रतिप्रश्न १००% पटले. लेखिकेला जेंव्हा द्यायचीत तेंव्हा देवोत पण मला आपल्या प्रश्नांसंदर्भात एक परदेशस्थ भारतीय म्हणून उदाहरणे देत आहे:
१. भारतीय लोक परदेशात जातात तेव्हा सार्वजनिक ठिकाणी देखिल अश्लील संभाषण ऐकू येते/अश्लील दृश्य दिसते. त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
ऐकायला येते. कान आणि नजर मेलेली आहे.
२. भारतीय लोकांनादेखिल परदेशात चोरी/लुबाडणुक यांचे अनुभव येतात. त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
आलेले माहीत आहेत. अगदी आत्ता आत्ता दोन भारतीय युवकांचे टेक्सास प्रांतात खून झाले आहेत.
३. भारतीय लोकांना अजूनदेखील परदेशात कमीपणाने वागवले जाते (Black/Asian). त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
आत्ताच्या मध्यावर्ती निवडणूकीत व्हर्जिनीया प्रांतातील रिपब्लिकन उमेदवार हा एका भारतीय वंशाच्या अमेरिकन पत्रकाराला (व्हिडीओ) माकड म्हणाला.
४. परदेशी लोक भारतात येऊन अश्लील धंदे करतात त्याबद्दल तेथील रहिवाश्यांना त्यांच्या देशाची लाज वाटते का?
हा भाग मी पण माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहीला आहे.