साक्षात आपणच आम्ही चाचपडत केलेल्या या प्रयत्नाला प्रतिसाद दिलेला पाहून धन्य झालो. त्यातही आपल्याला ते आवडले हे पाहून तर आमच्या आनंदाला पारावरच उरला नाही. एखादा अर्थ आपल्याला पटला नसेल अशी आम्हाला भीती वाटत होती. परंतु ती आपण फोल ठरवली. नवोदितांशी चांगले वागून त्यांना आपल्यात कसे सामावून घ्यावे याबद्दल वस्तुपाठ घालणारा आपला हा प्रतिसाद आहे. गळफासाचा शेर आमच्याकडून नजरचुकीनी राहिला का, परंतु परत एकदा वाचूनही हा शेर आम्हाला सापडला नाही, दृष्टीदोषाची तपासणी करून यायला हवी असे वाटते.

(आनंदाचे डोही आनंद तरंग) बाजीराव