अमेरिकेतील भिकाऱ्यांची सर्किटरावांनी लिहीलेली सत्यकथा वाचा नी ठरवा...
सगळीकडे हेच असते... तरी बरे आपल्यकडील लोकांनी वरील कथेप्रमाणे कुणाला बेदम मार तर दिला नाही...
मला वाटते की चर्चेचे शीर्षक चूकीचे आहे... लेखिकेची कमकुवत मानसिकता दाखवणारी...
त्या ऐवजी , "मला भारतातील या *** प्रकाराची लाज वाटते "
असे लिहीले असते तर जास्ती संयुक्तिक झाले असते.
असो, एका अशा घटनेवरून सरळ सरळ सगळ्या देशाला नावे ठेवणे अयोग्य...
स्वतःत बदल करणे आवश्यक आहे, सर्वंच बाबतीत!
काहीही झाले तरी स्वदेशाबद्दल असे अवमानकारक उद्गार/लेखन करणे हा अक्षम्य अपराध आहे असेच मला वाटते.
स्वतः असे बोलले तर मग समोरच्याला/बाहेरच्याला आपल्याला अजुन नावे ठेवायला काहीच वाटत नाही..आणि मग या गोष्टींची सवय लागते.
आजही, क्रिकेट च्या बातम्या येतात किंवा नुकतीच अँजेलिना जोली भारतात आली तेव्हा तिच्या शरिररक्षकांनी काढलेले असभ्य उद्गार, हे करण्याची त्या लोकांची हिंम्मत होते त्याला कारण आपल्यासारखी काही कमकुवत लोकंच ...
तेव्हा लेखात उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल खेद जरूर आहे, पण शीर्षक वाचून मन जास्त दुखावले...
--सचिन