अनु मस्तच लिहिलेयस.
पण काही म्हण हा सिनेमा मला आवडला.
ए. सी. पी. जयचा निळ्या फुलाफुलांचा सदरा..
हा सदरा जया बच्चनने उशीला अभ्रे शिवून उरलेल्या कापडातून बिचारीने मुलाला शिवला असेल असं वाटत होतं. पुढे एका गाण्यात का दृश्यात सूनबाईला पण एक फाटकी चादर गुंडाळायला दिली आहे.
सर्कीट, तुम्ही म्हणत्रा ते दृश्य फारच सोबर पद्धतीने चित्रपटात घेतले आहे. विशेषतः ऍश आणि बिप्स पूर्ण चित्रपटभर ज्या कपड्यात वावरतात त्यामानाने हा प्रसंग सोज्ज्वळच म्हणावा लागेल.
बाकी महाराष्ट्र पोलिस एक आंतरराष्ट्रीय देशी चोर आमच्या मुंबईत येऊन डाके घालेल हे आधीच प्रेडिक्ट करून गुन्हा घडायच्या आधीच योग्य खबरदारी घेतात; त्यातही तो कोण- कसा दिसतो हे समजण्यापुर्वीच जयने तो तरूण असणार असे समजून सुनहरीची तरतूद (टेक्नोसॅव्ही चोर्यांच्या प्रशिक्षणासह)आधीच करून ठेवणे म्हणजे खू..पच झालं की हो.
बाकी मंडळी, डोकं बाजूला ठेऊन हृतिक आणि त्याचा डान्स बघून डोळ्यांचं पारणं फेडायचं असेल तर चित्रपट अवश्य बघा. (आणि धूम १ प्रमाणे अलीच्या स्वप्नातली मुलंबाळं, ऍशचे परदेशी फॅशन डिझायनरच्या डिझाईन्स चोरी करून बेतलेले ड्रेसेस, आणि डब्बलरोल आणि पावपट कपड्यातली बिप्स ज्यांना बघायची असेल ते ही बघोत बापडे!)