मागे काटरीना वादळ आले होते कुठेतरी, त्यावेळी तेथील लुटी आणि बलात्कारांच्या बातम्यांनी आपल्या येथील वृत्तपत्रांचे रकाने भरले होते. ते वाचून पाश्च्यात्यांच्या तथाकथित नागरी संस्कृतीचे मासलेवाईक दर्शन झाले. दर्म्यान आपल्याला, २६ जुलै, बॉम्बस्फोट, आणि त्सुनामीचे अनुभव आले. त्या वेळी सर्वसामान्य अशिक्षित वाईट पुरुषी नजर असलेल्या, कायम वरकड कमाईची अपेक्षा ठेवणार्या भारतीयांनी त्याला (वरील आपत्तींना) दिलेल्या प्रतिसादाने वर्तमानपत्रांचे रकाने भरले होते. त्यावेळी भारतीयांच्या ग्राम्यतेचा अनुभव आला. हे अनुभवही आपापल्या फ़िरंगी मित्र/मैत्रिणींना सांगायला हरकत नाही.

-मन्दार.