मृदुलाजी,
आपल्या देशवासीय बांधवांची वागणूक त्यांना आवडली नाही म्हणता,
ही गोष्ट दखलपात्र आहे.
त्यांच्या कारणांची शक्य तिथवर खोलवर चौकशी करा.
ती कारणे आपल्याला निवारण्यासारखी असली तर आपण निवारू.
जरूर तिथे प्रबोधन करू.
असे घडू नये हे आपण पाहायलाच हवे.
मात्र, तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला भारत ते म्हणतात तसाच दिसला होता का?
म्हणूनच तुम्ही तिथे गेलेला आहात काय?
नसल्यास, तुम्ही त्याकाळी पाहिलेल्या/राहिलेल्या चांगल्या भारतवासाची
उदाहरणेही त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवीत.
परदेशस्थ भारतीय तेथल्या भारताबाबतच्या माहितीचे उत्तम स्त्रोत आहेत.
तेव्हा तुम्ही दिलेल्या माहितीवर अवश्य विचार करून काही सुधारणा करता आली तर करू.