लाज वाटणे = देशद्रोह या समीकरणाची मजा वाटली.
मला वाटतं की भारताची लाज वाटणे म्हणजे ती तशी गोष्ट माझ्या देशात घडली याची लाज वाटणे. इतर अभिमानास्पद गोष्टी जमेस धरूनही अशी लाज वाटण्यात वावगं काय ते मला कळत नाही.
चोरी करणाऱ्या मुलाबद्दल आईला लाज वाटण्यात चूक काय? लाच खाऊन कुचकामी बांधकामे करून लोकांचे जीव घेणाऱ्या पित्याबद्दल मुलाला लाज वाटली तर त्यात गैर काय? ही लाज त्या त्या लाजिरवाण्या गोष्टीच्या संदर्भात असते असं मला वाटतं.
शेकडो वर्षे पिचत पडलेल्या दलितांनाही डेक्कनचे डबे जाळण्याबद्दल लाज वाटावी अशी अपेक्षा माझ्यासकट आपल्यातले बरेच करीत असतीलच की?
इराक आणि भारतीय पारतंत्र्य या संदर्भात आपापल्या देशांची लाज वाटणारे पाश्चात्य मला माहीत आहेत.
तुम्ही अमेरिकन असा वा इथिओपियन - "अतिथि देवो भव" च्या गप्पा मारणाऱ्या माझ्या देशात अशा लाजिरवाण्या गोष्टी तुम्हाला सहन करायला लागतात याची मला विनाअट लाज वाटते.
"तुमच्याकडे पप्पू कलानी असेल, तर आमच्याकडे गवळी आहे" अश्या कोडग्या स्वाभिमानाचा काय उपयोग?
- कोंबडी