एकंदर ही चर्चा भावनिक होते आहे असे दिसते. कुठेकुठे फालतू वैयक्तिकही झाली आहे.तसेच मॅकॉलीची थालिपीठे अजून शिळी झालेली दिसत नाहीत, हेही चर्चेतून दिसते. भारतीयांना भावनिक मुद्द्यांना हात घालून चारचौघांच्या टाळ्या मिळवणे आवडते, हे खरे. 'कानाखाली आवाज काढणे असो' वा 'अर्ध्या हळकुंडाने 'गोरे' होणे' असो, अशा प्रकारचे प्रतिसाद त्यातलेच प्रकार. कानफाड वाजवले की भारताबद्दलचे प्रेम सिद्ध होते, अशी काही भाबड्या लोकांची निरागस समजूत  आहे. वाचून हसू आले.

मला भारताची लाज वाटत नाही. पण कुणाला वाटलीच तर मला तो देशद्रोही वाटत नाही. मी स्वतःला  ह्या जगाचा नागरिक समजतो. "मी भारतीय आहे.त्यामुळे भारताची बाजू चुकीची असली तरी राखायलाच हवी, हिंदू आहे त्यामुळे हिंदू धर्मातील वाईट गोष्टींचे लंगडे समर्थन करायला हवे," ही कूपमंडुक आणि पोरकट मानसिकता आहे.

 त्यामुळे "कॉम्रेड भारत देशाची लाज वाटली हे वाक्य बोलायला लाज नाही वाटली," असे म्हणणारे कॉम्रेड बोगस म्हणावे लागतील. कॉम्रेडांनी बुद्धिवादी असायला हवे. अगदी अमेरिकेत किंवा ग्वाटेमालात मार्टिनच्या बायकोशी असे वर्तन झाले असते तरी आधी एक पुरुष आणि माणूस म्हणून मला तेवढेच वाईट वाटले असते.

सरतेशेवटी आम्हा भारतीयांना धड चर्चा करता येत नाही आणि धड वाद/युक्तिवाद करता नाही, एवढे मात्र वाटते. आमची बौद्धिक वाढ खुंटली आहे, असे वाटायला लागले आहे.

चित्तरंजन