बा अनिरुद्धा,

इतरांचे कासोटे सोडून
आता तुझे अंत:मन मुक्त व्हावे
त्यांच्या शब्दांच्या कुबड्यांपलीकडे
उडत रहावीत तुझ्या प्रतिभेची पाखरे...

तुझ्या कल्पनेच्या विहाराला
आता नको कुणाच्या बेगडी बेड्या
पाडसासम विहरावे आता
तुझे स्वच्छंदी कविमन

गल्लीतल्या पिंका राहू दे
तुझेच रंगो आता खोल अंतःपुर... 
गड्या आता शिमग्याची वाट कशाला
लक्ष स्वतंत्र दीप आता तुझे स्वतःचे

सन्जोप राव