मी काल माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या प्रकाराबद्दल लाज वाटावी की इतर कोणती भावना जसे की चीड हा वैयक्तिक मुद्दा आहे. एकाच प्रसंगावर निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या भावना असू शकतात,
हे नैसर्गिक आहे. पण मला खालील गोष्टींची मात्र लाज वाटते आहे.
१. इथे ज्या वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिसाद दिले जातात त्याची.
२. एखाद्याने आपल्या मताच्या विरुद्ध मत व्यक्त केले तर ज्या विविध
प्रकारे त्याला/तिला नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो त्याची.
३. सभ्यता, शिष्टाचार यांची ज्या पद्धतीने वाट लावली जाते त्याची.
४. माझा मुद्दा खरा, पुढे तुला काय म्हणायचे आहे त्याची मला
पर्वा नाही ह्या वृत्तीची.
५. दुसर्या व्यक्तीचा माणूस म्हणून मान राखला जात नाही त्याची.
आपण बर्याच वेळा असा शब्दप्रयोग करतो, " माणूस आहेस की जनावर?"
ह्यामागे आपल्याला आपण माणूस म्हणजे सर्वश्रेष्ठ असा एक समज असतो.
मला कधीकधी प्रश्न पडतो, खरेच आपल्या मेंदूची वाढ होऊन आपण
प्रगल्भ वगैरे झालो आहोत का? तसे असते तर वाद-विवाद करताना
आपण साधे शिष्टाचार पाळले नसते का? की भावनाप्रधान न होता
आपल्याला चर्चाच करता येत नाही?
हॅम्लेट