एकंदर ही चर्चा भावनिक होते आहे असे दिसते ...... भारतीयांना भावनिक मुद्द्यांना हात घालून चारचौघांच्या टाळ्या मिळवणे आवडते,

सरतेशेवटी आम्हा भारतीयांना धड चर्चा करता येत नाही आणि धड वाद/युक्तिवाद करता नाही, एवढे मात्र वाटते. आमची बौद्धिक वाढ खुंटली आहे, असे वाटायला लागले आहे.

दुर्दैवाने हे खरे आहे असे म्हणावे लागेल.

दुसऱ्यांकडेही दोष आहेत असे म्हणून आपल्या दोषांचे समर्थन करता येणार नाही. दोष दूर करायचे तर आधी ते आहेत हे मोकळेपणाने मान्य करावे लागेल.

एकंदर प्रगल्भतेच्या अभावाने आणि कोणत्याही तर्कसंगत युक्तिवादाच्या अभावाने भावनेचा आधार घेतला जातो असे वाटते.