मला वाटत इथे विषयांतर फार होते आहे. इथे लाज वाटण्या बद्दल जास्त चर्चा होते आहे.

मुद्दा जर बौद्धिक आणि भावनिक असा वेगळा करायचा असेल तर मला वाटते चर्चेचे दोन भाग करा.

आम्हाला चर्चा करता येत नाही हे मत सुद्धा पटत नाही. कदाचित जुन्या थालीपिठांबद्दल बोलत आहात तर मला वाटत की लाज वाटण्या सारखे मुद्दे बरेच आहेत. त्यावर सविस्तर चर्चा नक्कीच करू. ती ही बौद्धिक. मुख्य मुद्दा हा होता की भारतीय असण्याची अन भारताची लाज वाटली. हे म्हणजे मला लाज वाटते मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे. इकडे म्हणताना भारतमाता वगैरे म्हणायचं. दिमाखात सगळे भारतीय सण साजरे करायचे. गोऱ्यांची चाकरी करण्यासाठी कोणत्याही थराला जयाचं अन त्यांनी तुमच्या अवगुणांवर नेमके नको त्यावेळी बोट ठेवले की लाज वाटून घ्यायची. हि निर्लज्ज लाचारी नाही का?

कोणाला थोबाडीत मारून अवगुण नक्कीच झाकले जात नाहीत. पण काही प्रसंग घडले म्हणून आख्खा भारत एकदम हीन दर्जाचा असल्याचे मानणे वा असे मान्य करणे काय दाखवते? तुम्ही किती हि प्रयत्न केला शॅमेलीऑन सरडा बनायचा तर ते शक्य नाही. कळप बदलायचा. मग त्याच कळपात आपण पहिल्यापासून आहेत हे स्वतःला समजवायचा प्रयत्न करायचा. मग त्या कळपातल्या एकाने म्हणाले की तू मुळातच आमच्या कळपातला नाहीस. त्या घाणेरड्या कळपातून आला आहेस. की मग तुम्हाला लाज कशाची वाटते? आधीचा कळप जिथे आपण इथे येई पर्यंत होतो तो घाण आहे म्हणून? की त्या कळपात आपण होतो म्हणून? की तिथे राहायचे नव्हते म्हणून इथे आलो. पण इथे सुद्धा मला पुर्ण पणे आपला कधीच म्हणणार नाहीत म्हणून? नक्की कशाची लाज वाटते? मुद्दा तुमच्या आधीच्या कळपाशी निगडित आहे. पण तुम्हाला स्वतःलाच कळत नाही की नक्की काय झाले आहे. दोष स्वतःवर घ्यायचा नाही म्हणून मग हो मध्ये हो मिसळायचे. स्वतःची धड कोणतीच ओळख नाही बनत. उद्या, भारतात बक्कळ पैसा मिळू लागला की हेच लोक म्हणतील, "तुम्हाला सांगतो तिथले ते किळसवाणे प्रकार पाहून काय वाटायचे ते सांगू शकत नाही. बरं झालं, योग्य वेळेत भारतात परत आलो. शेवटी कापलं, तरी आपलं." त्यावेळी नाही लाज वाटणार.

मला स्वतःला एक प्रश्न नेहमी सतावतो. तरुण वयात देशाबाहेर गेलेले लोक लग्न होऊन, मुले देशाबाहेरच झाल्या नंतर एका ठराविक काळानंतर भारतात का परततात? आपली मुले तिथेच का मोठी होऊ देत नाहीत?

इथे घडलेल्या प्रकाराचे समर्थन कोणीच करा म्हणत नाहीये. मुद्दा आहे तुम्हाला भारतीय म्हणवून घेण्याची वा भारताची लाज वाटते हा.