कारकुनाचे मनोगतवर लिखाण अगदी कमी असते. म्हणून की काय, ही शैली अगदी अपरिचित आणि नवीन वाटते.

चिमण्या कवितेने घरभर केलेला पसारा बघून बाबा अखेर चिडले. त्यामुळे कवितेच्या छोट्या निरागस अन टपोऱ्या डोळ्यात अश्रूंचे मोती जमा झाले आणि ते टपटप खाली पडू लागले. 'बाबा आपले ऐकत नाहीत' या विचाराने ती लाडकी बाला खट्टू झाली आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. आपल्या बाबांची त्यांनी आपली समजून काढावी म्हणून वाट पाहू लागली. अगदी नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्याचे म्हणणे तरी काय असे काहीसे एक गाणे आहे ना त्या गाण्याची आवर्जून आठवण झाली.

मला कदाचित 'गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या' आठवले असते. असो.

घराच्या ओढीएवढीच आपली साडेआठचे सिरीयल चुकवायची नाही म्हणून ती कवितेची आई  भरभर येते आहे. 'तणावमुक्त' होण्याचा एक हा सोपा उपाय तिला सापडला आहे. अल्फा टिव्हीचा किंवा तत्सम चॅनेलांचा विजय असो.

तेवढ्यात एका मैत्रीणीचा तिला मोबाईलवर फोन येतो. तो ध्वनी मोबाईल 'व्हाब्रेट मोडवर आहे' म्हणून 'झरझर भरभर खरखर' असे काही आवाज करतो असे सुद्धा कवीला ठासून सांगायचे आहे.

हे अगदी खास.