तुम्ही लोक कसे काय राहता तिथे असे बोलताना या दोघांना काही कसे वाटत नाही?
माझ्या मते हा काळजीपोटी विचारलेला प्रश्न आहे. कारण छेडखानी करणारे लोक सुसंस्कृत नव्हते हे तर परदेशी मित्रांना दिसत होते. भारतीय मित्राची पत्नी नेहमीच पाश्चात्य वेशभूषा करते. शिवाय या परदेशी मुली भारतात भारतीय वेशभूषा करत नसल्या तरी अनेकांच्या सल्ल्याप्रमाणे अंगभर कपडे घालत असत. इतके असूनही अश्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते ते का? मग तुम्ही कसे 'मॅनेज' करता? छेडछाड टाळण्यासाठी नक्की काय करायला हवे होते? असे प्रश्न आले.