उत्तरे चांगली आहेत. शेवटी विषय आपण सुरू केलात. प्रश्न आपण विचारलेत, अन उत्तरे सुद्धा आपणच दिलीत. मग हा एवढा खटाटोप कशासाठी? भारतीयाची मजा पाहण्यासाठी?
हि चर्चा वाचून माझे मत असे आहे...
- झालेल्या गोष्टी भूषणावह नक्कीच नाहीत. पण त्यावरून भारता बद्दलचे वा समाजा बद्दलचे मत बनवणे नक्कीच बरोबर नाही.
- आमच्यावर झालेल्या शेकडो वर्षाच्या राजकीय बलात्कारानंतर आम्ही जणू काही झालेच नाही असे वागणे शक्य नाही. त्यांतून अंग काढून घ्यायचा एक उपाय म्हणून भारत सोडा अन शक्य तेवढी नावे ठेवा म्हणजे गोरे लोक खूश. ही मानसिकता जास्त दिसून येते.
- काही लोकांनी काही प्रश्नांची उत्तरे देणे खुबीने टाळले आहे.
- भारतीय समाजाची मानसिकता बदलणे ही एक आजची मोठी गरज आहे. त्याची सुरुवात आपल्या पासून झाली पाहिजे. कदाचित देशाबाहेर स्वतःला वाचवण्यासाठी गळ्यात कॅमेरा घालायची वृत्ती सुद्धा बदलायला हवी. भारतीय लोक भारता बाहेर जातात पैस मिळवण्यासाठी. तुम्हाला पैसा वाचवायचा आहे अन आम्हाला मिळवायचा आहे. हा शुद्ध द्या अन घ्या व्यवहार आहे हे स्वतःला अन इतरांना सांगायची मानसिकता वाढण्याची गरज आहे.
- पर्यटना सारखा मुद्दा भारतीयांबद्दलची मते बनवतो. तिथे काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. तिथे होणाऱ्या चुका अन त्यांचे समर्थन निंदनीय आहे.
अवांतर,
शेकडो वर्षांच्या लूटमारी नंतर सुद्धा आम्ही अजून गांधीजीच राहावं हा मुद्दा कळत नाही. आणि आम्हाला लुटणाऱ्याला मात्र तुम्ही वाल्मिकी करून टाकलं हे तर त्यांहून सुद्धा अनाकलनीय वाटतं.