मग हा एवढा खटाटोप कशासाठी?

दिलेल्या उदाहरणात मनोगतींना काय वाटले असते हे जाणून घेण्यासाठी. परिस्थिती सुधारण्याचे काही उपाय आहेत का हे पहाण्यासाठी. (मला सुचलेला एक उपाय मी दिला आहे.)

भारतीयाची मजा पाहण्यासाठी?

यात मजा कसली आहे ते कळले नाही.

भारत सोडा अन शक्य तेवढी नावे ठेवा म्हणजे गोरे लोक खूश. ही मानसिकता जास्त दिसून येते.

मला अश्या मानसिकतेचे लोक अजूनही दिसलेले नाहीत. लोकांना भारताबद्दल ममत्व वाटते. जरा जास्तच अभिमान वाटतो आणि बारिकसारिक गोष्टींबद्दल लोक भावनिक होतात असा माझा अनुभव आहे.

कदाचित देशाबाहेर स्वतःला वाचवण्यासाठी गळ्यात कॅमेरा घालायची वृत्ती सुद्धा बदलायला हवी.

असे मला वाटत नाही. गोऱ्या लोकांनी सहिष्णू व्हावे असे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे. पण तोपर्यंत गळ्यातला कॅमेरा त्यांना सांगतो की मी तुमच्या देशाचा महसूल वाढवते आहे तर त्यात काही चुकीचे नाही.

शेकडो वर्षांच्या लूटमारी नंतर सुद्धा आम्ही अजून गांधीजीच राहावं हा मुद्दा कळत नाही. आणि आम्हाला लुटणाऱ्याला मात्र तुम्ही वाल्मिकी करून टाकलं हे तर त्यांहून सुद्धा अनाकलनीय वाटतं.

हे नीटसे कळले नाही. कोणी कोणाला वाल्मिकी केले आहे?