नविन प्रदेश म्हटलं की मानसिक धक्क्यांना प्रत्येकाने तयार रहायलाच हवं असं मला वाटतं. धक्के स्वागतार्ह नसतील तर योग्य ती उपाययोजना त्या संबंधित व्यक्तीने करायची असते ! थोडक्यात म्हणजे कोणाच्या पायाला चटके बसत असतील तर त्या व्यक्तीने स्वतः चप्पल घालणे जरूरीचे असते ना की सगळ्या रस्त्यावर चामडे अंथरायची सूचना करायची !
माझ्या वरील मतमांडणीचा असा सूर अजिबात नाही की वरील मूळ लेखात नमूद मुलींना ज्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागला त्या धटींगणांचा काही गुन्हा नाही, पण म्हणून त्या मुलींनी स्वतःच्या हिंडण्याफिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ द्यावी का? हा मुख्य प्रश्न आहे. त्या धटींगणांचा योग्य तो समाचार घेणे जर त्या मुलींना शक्य नसेल तर तसा तो घेण्यास त्यांच्यासोबतच्या गाईड लोकांनी/इतर सहृदय स्थानिक मंडळींनी घ्यायला हवा, असे वाटते. माझ्या मते त्या मुलींनी या अन्यायाला समर्थपणे तोंड देणे गरजेचे आहे ज्यामध्ये स्थानिक भारतीय जरूर त्यांच्या मदतीला धावून जातील असे वाटते. भारत इतकाही काही गयागुजरा नाही...