कोणाच्या पायाला चटके बसत असतील
चटके बसणे आणि चटके देणे यात फरक आहे की नाही? जर एखादा गट जाणूनबुजून त्रास देत असेल तर त्या गटाला शिक्षा करायची की तुला त्रास होतो तर तू तिकडे जातोस कशाला असे म्हणायचे?
मी दिलेल्या उदाहरणात स्थानिक लोक मदतीला आले नाहीत. सहा महिन्यांच्या वास्तव्यात ३/४ महिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून, पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करून, काही फरक पडत नाही, उलट आणखी लोक पैसे मागतात हे पाहून, पुष्कळ मनस्तापानंतर त्या मुलीने घराबाहेर न फिरण्याचा निर्णय घेतला. कारण मुळात, रोखून पाहणे, अचकट विचकट बोलणे हे 'गुन्हे' पोलिसांना विशेष वाटत नाहीत. सर्वसामान्य जनतेलाही, त्यात काय एव्हढे असेच वाटते.