चुरचुरीत समीक्षा मस्तच आहे. मनांत येणारे तार्किक मध्यमवर्गीय विचार तर खासच. मला हिंदी सिनेमांची खास नावड आहे, त्यामुळे मी सिनेमे बघायला जात नाही. डोके बाजूला ठेवून सिनेमा बघणे हा माझ्यासाठी अत्यंत अवघड प्रकार आहे. त्यामुळे मी शक्यतो हिंदी सिनेमांच्या वाट्याला जाण्याचे धाडस करत नाही. मात्र अशी खिल्ली उडवणारी समीक्षा वाचायला मात्र नक्कीच आवडते.