मज नका पुसू हे.... काय कसे अन केव्हा होते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !

सुंदर कविता/गीत. वृत्तपालनात अधिक सफाई आल्यास अधिक मजा येईल असे सुचवावेसे वाटते. दीर्घ शब्द वृत्तपालनासाठी ऱ्हस्व केले असल्यास तसे दाखवावेत.

तिज वेढुन घेता... हळू उमलती मनात गाणी
ती नसे कुणी तरि... दाटुन येते डोळा पाणी
ती मुकेपणाने कुठली भाषा बोलुन जाते?
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !

वा!