उत्तम माहितीपूर्ण लेख. आवडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाबद्दल बोलायचे तर समतेचे प्रतिक असलेल्या
विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वर, तुकोबाबरोबर बुद्ध आणि बाबासाहेबांना देवघर
आणि प्रेम लाभले.
हे खरे आहे. एकाप्रकारे हे चांगले झाले. कारण त्यामुळे दलितांची अस्मिता तेवत राहिली. पण बाबासाहेबांनी व्यक्तिपूजा असली मान्य नव्हती. एकदा का माणूस देव्हाऱ्यात गेला की त्याच्या जीवनाचा, विचारांचा साक्षेपी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी कठीण होऊन बसते. त्यामुळे ह्या महापुरुषांचे कार्य अलौकिक असले तरी कुणालाच देव्हाऱ्यात बसवायला नको. शेवटी 'देव नाही देव्हाऱ्यात' नाही हेच खरे.
चित्तरंजन