डॉ. बाबासाहेब आंबेडकर या एका व्यक्तीने भारतातील सामाजिक इतिहासाला कलाटनी दिली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या परंपरांना मुठमाती देण्याचा त्यांचा संघर्ष त्यांच्या अखेर पर्यंत चालला.
त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सकारात्मकतेचा उल्लेख वर नामदेवरावांच्या लिखाणात आलेला आहे तसाच तो धर्माधिकारी सरांच्या भाषणातही जाणतवतो.
'याची देही याची डोळा' आपल्या समाज बांधवांचा उद्धार करायचा या धेय्याने झपाटलेले बाबासाहेब तब्बल ३५ वर्षे हिंदू धर्मात होते मात्र त्याकाळच्या राष्ट्रीय नेतृत्वाला या विषयाचे गांभीर्य लक्षात आले नाही. त्या नंतर मात्र बाबासाहेबांचा दृढ निश्चय झाला व त्यांनी धम्म दिक्षा घेतली. आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी भारताच्या मातीशी आपली नाळ जोडणाऱ्या बौद्ध धम्माला आपलेसे केले.
बाबासाहेबांचे धम्मपरिवर्तन आणि घटना निर्माण एवढेच काम आपल्याला ठाऊक असते, मात्र अर्थशास्त्री , कायदेतज्ञ, समाजशास्त्री आदी म्हणून त्यांची कारकिर्द नेहमीच दुर्लक्षील्या गेली आहे.
आज या महान व्यक्तीमत्वाला निर्वाण प्राप्त होऊन पन्नास वर्षे लोटली आहेत. आज त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन !!
नीलकांत