प्रथम महामानवास कोटी कोटी प्रणाम !

कालांतराने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे सर्व नाथसंप्रदायी झाले. या संप्रदायाने कालानुरूप समता आणायचा समाजात प्रयत्न केला.

याबाबतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथात-संतसाहीत्य या विभागात खालील लेख लिहीला आहे.-

सर्व ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी वेदान्त विषयावर भाष्य केले.ब्रम्ह हे सत्य आहे आणिते सर्वव्यापी आहे असे ते म्हणाले; पण शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरिरीने समर्थन केले.ज्ञानेश्वरांनी व त्यांच्या भावंडांना ब्राम्हणांनी जाती बहीष्कृत केले होते. त्यांना पुन्हा जातीत जावयाचे होते. त्यामुळेच त्यांनी रुढ चातुर्वर्ण्याच्या कल्पना उचलुन धरल्या व समाजापुढे कच खाल्ली. ब्रम्ह जर सर्वव्यापी आहे ,तर ज्ञानेश्वर असे म्हणू शकले असते,कि तुम्ही मला बहिष्कृत केले,मी महारवाड्यात राहीन त्यांच्यातही ब्रम्ह आहे. (पृष्ठ क्र.५७५).

ज्ञानेश्वरांसारख्या महान संताने शुद्रांचा उल्लेख विष्ठेशी,शौचमळाशी संबंधीत असा केला आहे हे ध्यानी धरावे.(पृष्ठ क्र.५८८).

याबाबत कृपया नामदेवराव(नाम्या) यांनी खुलासा करावा ही त्यांना विनंती.

आपला

कॉ.विकि