आंबेडकरांनी भारतावर आणि भारतीयांवर नेहमीच प्रेम केले. तरीही त्यांना भारत "जसा" होता "तसा" बिलकुल पसंत नव्हता. शरमेची आणि रागाची अनेक गळवे भारतभर जागोजागी ठुसठुसत होती. त्याचे वाभाडे आंबेडकरांनी नेहमीच काढले.
आपल्या वर्तनाने आणि नेतृत्वाने त्यांनी भारताचे रूपरंग अनेक अर्थांनी बदलून टाकले. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि धर्मपरिवर्तन ही त्या वाटचालीतील ठळक उदाहरणे म्हणता येतील.
आपले म्हणणे योग्य आहे. माझे म्हणणे असे नव्हते की त्यांना भारत जसा होता तसाच आबडत होता, पण त्यांनी त्यांच्यावेळची वर्तमान स्थिती मान्य करून देशावरील प्रेम कमी केले नाही. म्हणूनच ते असेही म्हणाले की "स्वप्नात देखील मी मातृभूमीशी प्रतारणा करणार नाही".
या देशात अर्थ नाही असे म्हणून ते अमेरिकेत प्राध्यापक म्हणून अथवा लंडनला सहज राहू शकले असते. पण तसे त्यांनी केले नाही. तसेच, सवर्णांमुळे त्रास झाला म्हणून त्याचा द्वेष ही केला नाही की तुसती बोटे मोडत बसले नाहीत. पण त्यातून मार्ग काढत पुढे गेले आणि स्वतःचे आदर्श व्यक्तिमत्व इतरांपुढे ठेवले. या अर्थाने मी म्हणालो की "जसा होता आणि जसा अनुभवला" तशा भारतावरील प्रेम करणे त्यांनी सोडले नाही.
एका जेष्ठ्य भारतीय व्यक्तिकडून (सामाजीक नेत्याकडून) मी एकदा व्यक्तिगत बैठकीत एक चांगला उद्गार ऐकला होता. त्या व्यक्तीला एका दुसऱ्या विचारांच्या माणसाकडून विरोध होत होता. पण त्यांच्या भाषेत, "शब्दाने शब्द वाढवायच्या ऐवजी, द्वेष करायच्या ऐवजी, मी त्याच्यावर 'ऍग्रेसिव्ह प्रेम' केले आणि त्याची चांगली (पॉझिटिव्ह) फळे मिळाली".
काही अर्थाने आंबेडकरांनी असे ऍग्रेसिव्ह प्रेम भारतावर केले असे वाटते...