मुक्ती,प्रतिसादाबद्दल धन्यवाद.  मायक्रोवेव मध्ये डाळ भाजता येईल,प्रथम ३-४ मिनीट ठेवुन पहावे,चमच्याने परतून पहावे,परत ३ मिनीट ठेवावे.असे  ३-४ वेळेस किंवा  डाळ भाजेपर्यंत करावे. पिठीसाखरेच्या प्रमाणावर तुपाचे प्रमाण अवलंबुन आहे,साखर जास्त(चवीनुसार)असेल तर ३-४ चमचे तुपाने लगेच चिकटपणा वा ओलसरपणा  येवुन लाडु वळतात. जर लाडू  वळत नसतील/ फार ठिसुळ होत असतील तर तुपाचे प्रमाण वाढवावे, व वळुन झाल्यावर २० ते ३० मिनीट फ्रिजमध्ये ठेवावेत, यामुळे तूप गोठून लाडूंचा ठिसुळपणा जाऊन  एकत्रीतपणामुळे गोल आकार राहतो