संजोप,चित्त
जगातले समस्त खाद्य रसिक आणि त्यांना प्रेमाने खाऊ घालणारे सुखात नांदोत!
अगदी पटले! :)
तात्या,
भारतीयच का रे? सगळ्याच खाद्यसंस्कृतींचा जागतिक विजय असो!
मिलिंद,
आर्नॉल्ड श्वार्झनेगर हे म्हणजे काहीसे पिवळा पितांबर झाले म्हणायचे.
हो,हो!तसेच काहीसे.
प्रियाली,
ती तिरामिसूची पाककृती करून पाहिली की जरूर टाका
नक्की,ख्रिसला आणि मला एकत्र वेळ मिळून शिकले की आधी करून पाहिन आणि लगेच मनोगतावर देईन!
मीराताई,
पोळीचा लाडू मला पण खूप आवडतो,तुम्ही सांगितला तसाच! पण त्यावेळी माझ्याकडे गूळ नव्हता,भारतीय दुकानात जाऊन आणण्यात वेळ गेला असता आणि पिठीसाखरवाला पोळीचा लाडू मला विशेष आवडत नाही,म्हणून मग माझी पसंती फोपोला!!
सूर्य,
मग झाली की नाही फोपो?
मधुरा,
आजीआजोबांना मनोगतवर लवकरच आणते.
आपल्या सर्वांच्या खाद्य-अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद!
स्वाती