जरा गैरसमज झाला, मला म्हणायचे होते की असे अजून बरेच मराठमोळे पदार्थ आहेत जे मी फक्त एकले/वाचले आहेत किंवा शाळेत मित्रांच्या डब्यात खाल्ले आहेत (माझ्या डब्यात तर ब्रेड जॅम, शंकरपाळ्या असले बाहेरचे पदार्थ असायचे) त्या मुळे फोडणीच्या पोळ्या, पोळीचे लाडू आणि बरेच काही मला माहित नाही.

पण तुझ्या उत्तराशी मी मना पासून सहमत आहे, एका खवय्येचे मन दुसरा खवय्या न बोलता ओळखू शकतो. मी बरिच मुशाफिरी करतो पण त्याच बरोबर कुठे काय चांगले खायला मिळते हे सुद्धा शोधत असतो. आता केवळ तुझ्या साठी आणि आपल्या इतर खवय्ये मनोगतीं साठी (तात्या अग्रस्थानी) लवकरच माझे आवडते मुंबई, पुण्यातले ठिकाण मी लेखमालेतून प्रसिद्ध करेन पण त्या आधी जंजिराचा वरती लेख :).