माननीय लिखाळ राव,
सर्व मानसशास्त्रज्ञांना माणसाचे व्यक्तिमत्त्व एकसंध नसून त्याचे अनेक भाग झालेले असतात असे आढळून आले आहे. मनोविश्लेषणाचे एक सुलभ आधुनिक तंत्र आहे. त्याला Transactional Analysis (टी. ए.) असे म्हणतात. त्यानुसार माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन भाग प्रत्येकाला अनुभवायला येतात. एक भाग संस्कारांनी प्रभावित असतो व तो संस्कारानुसार कार्यरत असतो. त्याला टी. ए. च्या परिभाषेंत Parent म्हणतात. दुसरा भाग व्यवहारी असतो व तो माणसाच्या व्यवहारज्ञानाप्रमाणे कार्य करतो. त्याला टी. ए. च्या परिभाषेंत Adult म्हणतात. तिसरा भाग भावनाप्रधान असतो व तो भावनेप्रमाणे कार्य करतो. त्याला टी. ए. च्या परिभाषेंत Child म्हणतात. यापैकी कुठल्याही दोन भागांमधले द्वंद्व बऱ्याच वेळा अनुभवाला येते. प्रत्येक भाग निरनिराळ्या दिशेने कार्यरत होत असल्याने त्यांत व्यक्तिमत्त्वाची ओढाताण होते व काय करावे याचा निर्णय घेणे कठीण जाते.
अधिक माहितीसाठी डॉ. हॅरिस यांचे I'm OK, You're OK हे पुस्तक वाचावे.