इतक्या छान गझलेला प्रतिसाद देण्यास जो उशीर झाला, त्या बद्दल आधी दिलगिरी व्यक्त करतो.
पहिले तीन शेर मस्त आहेत. मला विशेष आवडले.
आठवे मला तिचे लाजणे पुन्हा पुन्हा
वेचुनी फुलांस ते माळणे पुन्हा पुन्हा
वा, छान!
रोज हेच व्हायचे पाहता क्षणी तिला
बोलणे कसेबसे, हासणे पुन्हा पुन्हा
वाव्वाव्वा!
रोखली किती जरी याद रोज यायची
अन असेच रोज मी जागणे पुन्हा पुन्हा
वा, छान.
वृत्ताच्या बाबतीत म्हणाल तर वृत्त खटकणे अथवा न खटकणे हे बरेचदा ते वृत्त वाचकाच्या किती परिचयाचे आहे यावरही अवलंबून आहे. हे वृत्त गझलकारांसाठी नवे नाही. राधिका जनास गा, राधिका जनास गा हे जुने वृत्त आहे. वाचताना यती बरोबर पहिल्या राधिका जनास गा नंतर घेतला वृत्त खटकणार नाही.
तसेच पुन्हा पुन्हा मुळे हासण्याची, माळण्याची, जागण्याची मजा येते आहे. त्यामुळे तुम्ही वृत्तात आणि अन्त्ययमकात बदल करू नये, असे सुचवावेसे वाटते.
शेवटचे दोन शेर अजून चांगले होऊ शकतील असे वाटते. ४ था शेर सपाट आहे. ५ वा शेर अस्पष्ट आहे. कल्पना चांगली आहे.