इथे सुद्धा संस्कृत,जर्मन किंवा चिनी भाषेची नक्कल का म्हणून करावी? तसे सुद्धा सर्वसाधारण पणे समकालीन मराठी व्याकरण आणि भाषा तज्ज्ञांचा प्रमुख विचार प्रवाह परभाषीय शब्दांच्या मराठीकरणाला होकार पण अती शुद्धीकरण नकार असाच आहे. ह्या बाबत मी मनोगत आणि विकिपीडियावर संदर्भासह माहिती वेळोवेळी दिली आहे .
भाषा शुद्धीकरण काही वेळा कसे डोक्या वरून जाते याचे उदाहरण म्हणजे माझा अशातील "भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत म्हणून ठरवून दिलेली निदेशक तत्त्वे " हा चर्चा प्रस्ताव , अक्षरशः एकही प्रतिक्रिया मिळाली नाही ! :)
शेवटी काळाची महती मोठी असते.
-विकिकर