असे आणखि काही प्रसंग येथे सांगावेत.
दरवर्षीची वारी आळंदी ते पंढरपूर पुण्यामार्गे जाते. अनेक वर्षांपूर्वी वारी पुण्यात असण्याच्या दिवशी एक विद्यार्थी कॉलेजहून दुटांगीवर घरी चालला होता. रस्त्यात सारसबागेजवळ एक 'मिनी-रिंगण' होते. तेथे गंमत बघत असताना त्या विद्यार्थ्याने शेजारी उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्याला (थोडे चेष्टेने, थोडे आढ्यतेने) विचारले - 'काय हो बाबा, इतके दिवस चालून जाता, पंढरपूरला जाउन तुम्हाला त्या धक्काबुक्कीत विठ्ठल दिसतो तरी का?' त्या म्हाताऱ्याने जाड भिंगांच्या चश्म्याआडून उत्तर दिले - 'पोरा, माझा ईठ्ठल या वारकऱ्यात असतो. त्याला सोदत असतो मी वारीत. पंढरपूरला जाईपरोत दर्सन न्हाय दिले त्याने असे न्हाय झाले एका बी वर्सी.'
थोबाडीत मारल्यासारखा बाजूला झालेल्या त्या पोराने पुन्हा म्हणुन कोणाच्याही कृतीबद्दल पूर्वग्रह न करण्याचा निश्चय केला. त्यानंतर अनेकदा तो हा निश्चय विसरला, पण अनेक प्रसंगी त्याला अजूनही तो म्हातारा आठवतो आणी निश्चय पुन्हा दृढ होतो.
तुमचा लेख हा असाच एक प्रसंग.