संघाने उचलून धरलेला 'सांस्कृतिक राष्ट्रवाद' हा त्याच अर्थाने तळवलकरांना अपेक्षीत आहे की अजून कुठला दुसरा सांस्कृतिक राष्ट्रवाद असेल तर ते कळले नाही.

जर त्याच अर्थाने अपेक्षीत असेल तर 'मराठीसाठी आंदोलन इत्यादीचा अवलंब झाला तर सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीला लागू शकेल.' हा उल्लेख शेवटच्या परिच्छेदात करून कसा काय वाढीस लागेल ते मात्र विशद केलेले नाही. उलटपक्षी, वाढीस लागलेच तर भाषिक युद्ध व प्रांतवाद वाढीस लागेल आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला हानी पोचेल असे वाटते.

त्यामुळे माझ्या सारख्या अल्पमती माणसाला तो लेख अजिबातच समजलेला नाही किंबहुना मी गोंधळलो आहे.