आपण आणि सर्कीटनी मांडलेले मुद्दे मान्य आहेत. गोविन्द तळवळकरांबद्दल मला आदर आहे आणि त्यांचे अग्रलेख लहान असतानाही वाचत आलो आहे. तसेच त्यांची पुस्तके ही वाचली आहेत.

जरी त्यांची विचारधारा ही हिन्दूत्ववादाच्या विरोधात असली तरी ती मला बऱ्यापैकी समतोल वाटायची. कारण त्यांचा संघ आणि तत्सम विचारधारेला विरोध होता. त्यात नवलही नव्हते कारण ते मानवेन्द्रनाथ रॉयना (ज्यांना लेनीनने आंतरराष्ट्रीय कम्यूनिस्टचळवळीचे प्रमुख केले होते, ज्यांना स्टॅलीनने नंतर बाजूला केले आणि जे त्यानंतर मानवतावादी झाले...) मानणाऱ्यांपैकी एक आहेत. पण त्यांचे नवरोजी ते नेहेरू हे त्यांचे स्वातंत्र्यलढ्यावरचे पुस्तक वाचले तेंव्हा पण सर्कीटरावांसारखाच खेद झाला कारण त्यात त्यांनी हिंदूत्ववादी क्रांतीकारकांवर आणि विचारधारेशी सापत्न भाव दाखवला असे वाटले.

आता तर या लेखात अतीच झाल्यासारखे वाटले. आपल्या दोघांच्या प्रतिसादामुळे एक मात्र वाटले की असे फक्त (लेखाबद्दल) मलाच वाटले नाही!