सांस्कृतिक राष्ट्रवादाचा येणारा धोका थांबवायचा कसा आणि त्यावर उपाय काय कोणि सांगेल का?
एक ना एक दिवस धोका निर्माण होणारच आहे पण परप्रांतीयांना. त्यामुळे प्रश्न पडतो भाषिक प्रातांवार निर्मिती करुन आपल्या देशाने चुक केली का? त्या त्या भाषेसाठी स्वतंत्र राज्ये निर्माण झाली असताना महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत तिकडील लोक का येतात. कारण त्यांच्या राज्यात सुखसोयी नाहीत . आता त्यांच्या राज्यात सुखसोयी नाहीत त्यात चुक कोणाची? आणि त्याचा भुर्दंड महाराष्ट्राने का सोसायचा.
मराठी लोकांत न्युनगंडाची भावना निर्माण होण्यास कारणिभुत कोण आहे सांगाल का जरा?
मराठी भाषेचा आग्रह महाराष्ट्रात नाहीतर कोठे धरायचा ते कळेल का ? भाषाभिमान बाळगणे चुकिचे का?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी पण राज्याच्या राजधानित मराठी बोलणारे किती तर २५ टक्क्याहुन कमी . याला विरोधाभास म्हणावे का राज्याची शोकांतीका. यासाठी उपाय काय योजावे कोणी सांगेल का?
आपला
कॉ.विकि