हे किंवा अशा प्रकारचे वर्तन हा मानसिक रोगाचा भाग आहे. 'मंत्रचळेपणा' असे याला डॉक्टर लोक म्हणतात. दिवसातून शंभर वेळा हात धुणे, पाचपन्नास वेळा साफसफाई करणे, स्वतःच्या किंवा इतरांच्या प्रकृतीबद्दल अनैसर्गिक काळजी वाटणे या 'कम्पल्सिव्ह बिहेविअर' मध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत. काही औषधोपचार आणि समुपदेशन यानी यावर बऱ्यापैकी मात करता येते.