पफोड्णीच्या पोली वाचुन मि भुतकाळात शिरालो एकदम. १२-१३ वर्षा पुर्वी मी इरान ला तीन महीने एक यन्त्र सामुग्री बसवीण्याच्या कामा करीता राहीलो होतो. शेवटचे थोडे दिवस आमचे मालक पण आले होते, तेव्व्हा येण्या अगोदर मला दूरध्वनी करुन विचारले होते कि मला काही हवे का? मी लगेच सांगितले कि काहीतरी खायला घेउन या. कारण तीन महिने मी बेचव जेवन करुन वैतागलो होतो. त्यानी  आल्यवर माज़्या हाती इतर गोश्टी बरोबर एक डबा दिल, आणी त्यात दुसरे तिसरे कही नसुन फो पो होती, त्याच्या पत्निने माज्यासाठी खास बनवुन पाठ्वलेली, त्याची चव अजुन जिभेवर रेगांळत आहे. जोशी मॅड्म धन्यवाद.

खानपान किस्से आवड्ले. आपल्या खाध्य संस्कृति महान आहे.