लोक यशाच्या गोष्टी करती
(हरलेल्यांच्या मला विचारा)...
वाव्वा!
खोट्याची ही 'अजब'च दुनिया!
चंद्र खरा की हाही पारा?...
वाव्वा!!
हे शेर फार आवडले.
हा- हा म्हणता वाढत गेला
आवरू कसा अता पसारा?...
ह्या शेरातली खालीच ओळ (सानी मिसरा) कसा आवरू अता पसारा केल्यास लय बेहत्तर होते असे वाटते आहे.
सूर लावतो आहे वारा
जुळवत बसतो मी तंबोरा...
हा- हा म्हणता वाढत गेला
आवरू कसा अता पसारा?...
हे मला जरा सपाटच वाटले.
मी मी म्हणता वाढत गेला चालेल का?
अर्थातच हे सारे व्यक्तिसापेक्ष आहे.
चित्तरंजन