चित्तोपंत,
अतिशय सुंदर, तरल गझल.. भुजंगप्रयात वृत्त अगदी सहजगत्या हाताळलं आहे तुम्ही.
तुझे ओठ माझे, तुझे शब्द माझे
कशी कौतुके मी करावी स्वतःची?.... वा!
फुलावा तुझ्या अंगणातील चाफा,
तशी गंधवार्ता मिळावी स्वतःची.... वा!
कुणा मोगरा मी, कुणा सोनचाफा
कशी जात मी ओळखावी स्वतःची? ...अप्रतिम!
हे शेर आणि 'जिथे पावले गात जावी स्वतःची' हा मिसरा विशेष आवडले. 'स्वतःची' ही रदीफ़ फारच सुरेख.
- कुमार