एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाबद्दल असे सांगतात की तो रोज एका ठराविक रस्त्याने फिरायला जात असे. त्यावेळी रस्त्याच्या कडेच्या प्रत्येक विजेच्या खांबाला हात लावून पुढे जाई. चुकून एखाद्या खांबाला हात न लावता पुढे गेला की लक्षांत आल्याबरोबर परत मागे येऊन त्या खांबाला हात लावून जाई.