संजोपकाका,
' ही खास पुरुषी भावना. Why men destroy things they love? माणसातली ही विकृत वाटणारी आसक्ती जी.एं. नी नेमकी टिपली आहे.
.....कडेलोट विरोधाभास... हे सगळे खास जी.ए. शैलीचे विनोद!
काळ्या वारेमुंग्यांची ही न संपणारी रांग, काळे पांढरे ठिपके, न सुटलेले आयुष्याचे कोडे आणि आसापास असलेली खुजी, बुटकी वेडीविद्री माणसे, जन्म मृत्यूचे पीळ पडलेली, वासना, विकार, विकृतींनी किडलेली आयुष्ये आणि एक तारीख -पगाराचा दिवस आणि शिकवण्या! विविध प्रसंगांचे, व्यक्तींचे धागे पसरवून नंतर त्याचे एक पेळूदार सूत काढावे तशी kraftmanship मला 'माणूस...'मध्ये दिसली.
आपण केलेले रसग्रहण आणि समिक्षा फार आवडली.
तटस्थ राहून, काही वेळा स्वत:च्या दृष्टीकोनातून पण जीवनावर भाष्य वगैरे करायचा अभिनिवेष नसलेले असे केवळ वर्णन म्हणून केलेले लिखाण मला फार आवडते. माझ्या मते जी एंनी केलेले लिखाण ही अशाच प्रकारची एक आजुबाजूच्या परिस्थितीची नोंद आहे असे मला वाटले.
'माणूस...' टंकलिखीत करून आम्हा पर्यंत पोहोचवण्या बद्दल मनापासून धन्यवाद.
--लिखाळ.