जरी त्यांची विचारधारा ही हिन्दूत्ववादाच्या विरोधात असली तरी ती मला बऱ्यापैकी समतोल वाटायची. कारण त्यांचा संघ आणि तत्सम विचारधारेला विरोध होता.

हे काही समजले नाही बुवा !

कुणाला कुठला राजकीय विचारप्रवाह आवडावा अथवा त्यापासून लांब राहणे पसंत असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. मला तळवळकरांचे आधीचे लिखाण हे हिन्दूत्वाच्या म्हणजे विशेष करून संघ आणि अर्थातच हिन्दू महासभा आणि शिवसेनेच्या विरोधात वाटायचे म्हणजे राजकीय दृष्ट्या विरोधी आणि त्या आणि तेव्हढ्याच प्रमाणात पुर्वग्रहदूषित वाटायचे. विचार करा एका मराठी वृत्तपत्राच्या संपादकाला राजीव गांधींनी पंतप्रधान असताना सल्लामसलत करायला बोलावले (पक्षिय नाही, देशाबद्दल,  समान विचारसरणीचे म्हणून)...(हे त्यांनीच लिहीले आहे).

परंतू त्यांना आपल्या संतांचा आणि सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूपणाचा कधी तिटकारा असल्याचे जाणवले नाही. सर्व संत झाले काय की शिवाजी झाला काय त्यांना कधी लांबचे झाले नव्हते. त्यांचा आवडता ग्रंथ ते दासबोध म्हणून सांगतात/निदान सांगयचे! किंबहूना लोकमान्य टिळक (हिंदूत्ववाद शब्द सावरकारांनी आणायच्या अगोदरचे हिंदूत्ववादी!) हे त्यांना अतिशय प्रिय!(कदाचित "ते" लेबल नसल्यामुळे!)

मला वाटते वरील थोडक्यात उत्तरावरून आपल्याला मला काय म्हणायचे असेल ते लक्षात आले असेल.