बाबांच्या दर्शनाला किती संख्येने लोक येतात आणि किती भलिमोठी रांग असते.

माझा मुद्दा निराळाच आहे.

मुळात देव दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगेत उभेच का रहा? देव जर सगळीकडे आहे तर त्याच्या दर्शनासाठी देवळात जायची गरज आहे असं मला नाही वाटत.(मी नास्तिक नाही...) माझ्या मताशी खुप जण सहमत असतील.

मला हेच वावगे वाटते कि जी व्यक्ती देवाच्या दर्शनाला येते ति काहि क्षुल्लकसा वेळ वाचविण्यासाठी देवाच्या दारिही कशी खोटं बोलु शकते. आश्या लोकांना जनाचि नाही पण मनाचि लाजहि वाटत नाहि का?

त्यात वावगं वाटण्यासारखं काय आहे? खोटं बोलणारा कुठेही खोटं बोलतो तो देवाचं दारं वगैरे पाहत नाही. त्याला जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नाही.

असे आणखि काही प्रसंग येथे सांगावेत आणि आपण या समस्येला सकारात्मकरित्या कसे सोडवू शकू याचि चर्चा करावि...

चर्चा करायची काही गरज नाही. ज्यांना वाटते कि देव फ़क्त देवळात आहे त्यांनीच रांगेत उभे रहावे आणि चीड वगैरे सोडून द्यावे.