प्राजु,

मला गुळाची पोळी खूपच आवडते. पोळी लाटायची पद्धत छान दिली आहेस. माझी आई या गुळाच्या सारणामध्ये थोडे  हरबरा डाळीचे पीठ भाजून घालते. शिवाय तीळकूट व दाण्याचे कूटही (खूप बारीक केलेले) घालते व अगदी थोडा खाण्याचा चुना.

मला आता कधी एकदा गुळाच्या पोळ्या करून खाते असे झाले आहे इतक्या मला त्या आवडतात. गोठलेले कणीदार साजूक तूप पोळीवर भरपूर पसरवून खाल्या तर खूपच छान लागतात. ह्या पोळ्या जितक्या शिळ्या होतील तितक्या त्या अधिकाअधिक छान लागतात. असो.

रोहिणी