मराठी माणसाने इतर प्रांतियांच्या (निदान एखादी तरी) भाषा शिकणे ही कल्पना चांगली आहे. पण ते देवाण घेवाणीच्या स्वरूपात (रेसिप्रोसिटी) होणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत आपल्यातला न्यूनगंड जाऊ देत मग ते शक्य आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र मराठी आणा (शाळेत आणि व्यवहारात) आणि मग आपल्या माणसांना शेजाऱ्याची भाषा शिकायला सांगा.

मी असे कुठेतरी वाचले आहे की स्वातंत्र्यानंतर जेंव्हा राष्ट्रभाषेचा प्रश्न आला तेंव्हा रा‌. स्व. संघाने अशी भुमिका घेतली होती की हिंदी राष्ट्रभाषा करा पण प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या मातृभाषेव्यतिरीक्त निदान एक तरी परप्रांतिय भाषा शिकायला लावा/उत्तेजीत करा. जेणे करून आपोआप (कालांतराने) भारतीय भाषांबद्दल म्हणून एक आत्मियता तयार होईल.