तरीही आपल्या देशातील दीडशहाणे 'विचारवंत' (उदाहरणार्थ अरुंधती रॉय, प्रफुल बिडवाई) आणि राजकारणी (गुलाम नबी आझाद) मात्र अफझलला फासावर लटकवू नका याचा घोषा लावून बसले आहेत. त्यांचे हे कृत्य देशद्रोहीपणाचे नाही का?

फाशीला विरोध करण्यामागे दोन कारणे असू शकतात.

१. अफझलविरुध्द फाशीची सजा सुनावण्याएवढा पुरावा नाही
२. कुणालाही फाशीची शिक्षा देणे योग्य नाही

पहिल्या कारणाचा जरूर अभ्यास व्हावा. त्या कारणामुळेच कदाचित बराचसा विरोध होत असावा. दुसऱ्या कारणामुळे फाशीला विरोध करणारे देशद्रोही मानल्यास तुमच्या अमेरिकेत मग असे करोडो देशद्रोही आहेत. तुम्ही अरुंधतीबाई आणि प्रफुल्लबुवांचे दीडशहाणपण कसे ठरवले, हे नीट समजावू सांगा. अरुंधतीबाई आजकाल पश्चिम बंगालातल्या एसईएझचा विरोध करताहेत. त्यामुळे डाव्या विचारसरणीशी सहानुभूती राखणारे डाव्या पक्षांचे आंधळे समर्थन करतात असा गैरसमज दूर व्हावा.